नील्स बोर - लेख सूची

जुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य

इतरांच्या संपर्कात असणे, किंवा त्याचा चरित्रकार एब्राहम पेज म्हणतो त्याप्रमाणे, इतरांशी जुळलेले (लेपक्षेळपशव) असणे, ही बोरची गरज होती, जवळपास निकड होती, म्हणा. त्याच्या चर्चा सॉक्रेटिक संवादांसाररख्या असत. त्यांमधून त्याच्या कल्पना सावकाश आकार घेत जात, घडत जात. हे इतक्या जास्त प्रमाणात होई, की काही जण त्याला भौतिकशास्त्रज्ञाऐवजी तत्त्वज्ञ मानत, त्याचे विरोधाभासांवर प्रेम असे. प्रश्नांच्या अनेक बाजू …